Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सूरुच दौंडमधील परत 7 कामगार निलंबित एकूण निलंबित कामगारांची संख्या 15 वर एका महिलेचा देखील समावेश

0
1 0
Read Time2 Minute, 12 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारण्यात आला असून दौंड आगाराचे कर्मचारी सुध्दा. 8 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संपावर गेले आहेत.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरच निर्णय घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडून माञ आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, तसेच दौंड आगारातील आठ कामगारांना दि. 11 नोव्हेंबर 2021 पासून निलंबित केले आहे. तर दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी 7 कामगारांचे निलंबन केले आहे दौंड आगारातील एकूण निलंबित कामगारांची संख्या 15 झाली आहे यात एका महिला कर्मचारी चा पण समावेश आहे या मुळे कामगारांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे आगारातील निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल अशी भूमिका कामगा(प्रतिनिधी)-रांनी घेतली यामुळे एखाद्या कामगाराने नैराश्यातून परत आत्महत्या केली किंवा काही बरे वाईट झाले तर यास एसटी प्रशासन व सरकार जबाबदार राहतील असे कामगारांच्या वतीने सांगण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
100 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: