Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची मुख्याधिकारी यांच्या सोबत बैठक संपन्न…

0
2 0
Read Time3 Minute, 58 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी चाळीसगाव नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या समस्या सोडवण्याकरिता मुख्याधिकारी श्री प्रशांत ठोंबरे उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे व इतर विभाग प्रमुख यांच्या समवेत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत 1)नोव्हेंबर 2005 पासून सेवेत लागलेल्या मृत व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र सफाई कामगारांच्या वारसांना जुनी पेन्शन व ग्रॅज्युटी अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.2) 12 व 24 वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे त्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात येईल.3)महिला विशाखा समितीमध्ये सफाई कामगारांचे प्रतिनिधी घेण्यात येतील.4) दुसरा व चौथा शनिवार सुट्टीचा पगार किंवा रोटेशनने सुट्टी देण्यात येईल.5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत 44 घरांचा प्रस्ताव तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे तात्काळ पाठवण्यात येईल.6) सफाई कर्मचारी राहत असलेली पत्राची चाळ नावावर करण्याबाबत ठराव झालेला आहे त्या नुसार घरे नावावर करण्याची प्रक्रिया करण्यात येईल.7) रोजंदारी कामगारांना सेवेत कायम केलेले व न्यायालयाचे आदेशाने कायम झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना अनुकंपा व लाड पागे समितीच्या धोरणाचा लाभ देण्यात येईल. याबाबत मुख्याधिकारी यांनी निर्णय घेतला व लवकरच याबाबतची अंमलबजावणी करण्याचे मुख्याधिकारी श्री प्रशांत ठोंबरे यांनी जाहीर केले.
बैठकीनंतर संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन नगरपरिषद आवारामध्ये करण्यात आले. तसेच सफाई कर्मचारी वसाहतीमध्ये संघटनेच्या चाळीसगाव शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शेकडो सफाई कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री नागेज कंडारे,राज्य सचिव श्री सुरेश बिसनारिया, राज्य कोषाध्यक्ष श्री धनराज पिवाल, वरिष्ठ समाजसेवक श्री सरजूजी जावडेकर, संघटनेचे मुख्य मार्गदर्शक श्री चेतनजी नकवाल, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत नकवाल, चाळीसगाव शाखा अध्यक्ष सुभाष चंदेले तसेच प्रेमराज गुजराती, अमन नकवाल, यासह मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.
अमन नकवाल, सागर चंदेले, उमेश चव्हाण, शंकर चव्हाण, अजय चंडाले यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या आभार मानण्यात आले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: