अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैध अग्नीशस्त्र वापरणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या आदेशानुसार स्था.गु.शा. जळगावने गुरुवारी रात्री वरणगाव परिसरात मोठी कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. वरणगाव शहरातील फुलगाव ब्रिजखाली काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकल (क्र. MP-68 ZC-3357) वरून आलेले दोन इसम थांबवून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात गावटी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि दोन मोबाईल असे एकूण १ लाख २९ हजार किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे
१) चरणसिंग उद्या चव्हाण (वय ३६, रा. चौडी, ता. बडवाणी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश)
२) पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)
दोघांनाही विनापरवाना अवैध शस्त्र बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस स्टेशनला CCTNS क्र. १९४/२०२५, आर्म अॅक्ट ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव आणि राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत उपनिरीक्षक सोपान गोरे, पोह. यशवंत टहाकळे, प्रेमचंद सपकाळे, प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, रविंद्र चौधरी, सचिन घुगे व चापोह. भरत पाटील (सर्व स्था.गु.शा. जळगाव) यांचा सहभाग होता.
या यशस्वी कारवाईमुळे गणेशोत्सव काळात संभाव्य मोठा धोका टळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
