अधिकार आमचा न्युज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी)- गुन्हा क्रमांक 94/2017 अंतर्गत भादंवि कलम 498(अ), 34 मधील तब्बल ८ वर्षांपासून फरार असलेला आरोपी निलेश प्यारेलाल कडेल, रा. लोणजे याला अखेर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन च्या पथकाने दिनांक ८ डिसेंबर रोजी अटक करून मोठे यश मिळवले आहे.
सदर प्रकरणात आरोपीने गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस तपासापासून लपून ठिकाणे बदलत फरार होता. त्यामुळे पोलिसांसाठी ही अटक मोठे आव्हान ठरली होती. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक (सपोनि) नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने केलेल्या तपास व गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीचा मागोवा घेण्यात आला.
पोलीस हवालदार विकास चव्हाण व संदीप माने यांनी अथक परिश्रम घेत आरोपी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
निलेश कडेल याच्यावर पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे. तपासादरम्यान आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत पोलिसांची दिशाभूल करत होता, अशी माहिती पुढे आली आहे.
अटक केल्यानंतर आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींवर चौकशी सुरू असल्याचे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या कारवाईतून स्पष्ट झाला आहे.
