33 दिवसात खुनाचा तपास, मित्राने केला मित्राचा घात…

1 0
Read Time9 Minute, 53 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव


दौंड(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे खानोटा ता. दौंड जिल्हा पुणे येथील अण्णासाहेब शहाजी भोसले यांच्या जमिनीमध्ये भीमा नदीपात्रातून एक अनोळखी मयत अंदाजे 30 ते 35 असलेली त्यांचे दोन्ही हात पाय टायर साठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पट्ट्यांनी बांधलेले मिळून आल्याने त्याबाबत खानोटा गावचे पोलीस पाटील सौ. उर्मिला गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिस ठाण्यात दिं 05/03/2021 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 127/ 2021 भा.दं.वि.का कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता सदर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात नंतर सदर घटनास्थळी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख ,मा. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस तसेच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार तसेच परी पोलीस उपाधीक्षक श्री मयूर भुजबळ यांनी घटनास्थळी भेट घेऊन वरिष्ठ गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस नारायण पवार पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ व पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना सूचना दिल्या.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदर गुन्ह्याचे तपास कामी दौंड पोलीस स्टेशन कडील डीबी पथक तयार करण्यात आले सदर पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. अधिकारी सहाय्यक फौजदार दिलीप भाकरे पो. हवा. असिफ शेख पो. हवा. पांडुरंग थोरात ,पो.ना. सचिन बोराडे, पो. ना. किरण राऊत, पो. ना. अण्णा देशमुख पो. कॉ. अमोल गवळी पो.कॉ. अमोल देवकाते, पो.कॉ. वालेकर ,पो.कॉ.आदेश राऊत पो. कॉ. रवी काळे पो.कॉ. किरण ढुके यांचा समावेश होता सदर पथकाने गुन्ह्याचे तपास तातडीने सुरू केला.
तपसाच्या सुरुवातीला अनेक अडचणी होत्या त्यामध्ये सदरचे मयत हे अनोळखी असल्याने व त्यास ओळखणारी व्यक्ति ही कुणी पुढे न आल्याने सदर मयताची ओळख पटवून हे प्रामुख्याने सदर तपासाचा महत्त्वाचा भाग ठरला होता सदर मयताच्या अंगावरील असलेले कपड्याचे कंपनी मार्क वरून दिली पथकाने तसं सुरुवात केली त्यावेळी पथकाने वेळी मयताची ओळख पटवण्यासाठी पुणे शहर सीआयडी कार्यालय अहमदनगर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये मयताचे फोटो पाठवायला आले व सदर खून झालेल्या इसमाचे वर्णन कोणी व्यक्ती हरवले आहे किंवा कोणाच्या अपहरण झाले आहे काय याबाबत माहिती संकलित करून त्याचे विश्लेषण आले परंतु तरी देखील सदर मयताची ओळख पटण्याजोगी काही माहिती मिळाली नाही
त्यानंतर तपासाची दिशा बदलून पथकाने दोन पोलीस ठाण्याचे हद्दीतील गावे पुणे-सोलापूर रस्त्यावरील धाबे ग्रामपंचायत कार्यालय कुरकुंभ एमआयडीसी परिसर व मुख्य चौकात मयताचे फ्लेक्स तयार करून लावले त्यावेळी तपासामध्ये मौजे गणेगाव दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून एक मुलगा गेले एक महिन्यापासून हरवला असले बाबत माहिती पोलिस निरीक्षक सचिन पाटील तसेच पोलिस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांना मिळाले नंतर लागलीच पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली पथकातील कर्मचाऱ्यांना सदर माहिती देऊन मिसिंग व्यक्ती चे घरातील लोकांना संपर्क करण्याबाबत सूचना दिल्या त्यानंतर दिनांक 7 /4/2021 रोजी मिसिंग व्यक्तीचे नातेवाईक नामे स्वप्निल लक्ष्मण निंबाळकर यांना दौंड पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील मयताचे कपडे व त्याचे फोटो दाखवला असता सदर अनोळखी मयताचे अंगातील टी-शर्ट वरती असलेले कंपनीचे मार्क व त्याने सदरचे अनोखी मयत त्याचा भाऊ प्रशांत उर्फ हर्षद लक्ष्मण निंबाळकर वय वर्षे 24 राहणार गणेगाव दुमाला ता.शिरूर असल्याचे सांगितले त्यानंतर त्याच्याकडील पोलीस निरीक्षक सचिन पाटील व डीबी पथकाने अधिक विचारपूस केली असता दिनांक 1/3/2021 रोजी मयत भावा गावातील इसम नामे मनोज उर्फ मारुती प्रकाश निंबाळकर यांच्या सोबत त्याच्या मोटरसायकलवर भुलेश्वर याठिकाणी देवदर्शनासाठी गेल्याचे सांगितले व त्या दिवशी त्याच्यासोबत त्याचे मित्र सतीश काशिनाथ भोसले राहणार वरवंड तालुका दौंड जिल्हा तसेच सागर नवनाथ दाभाडे गणेगाव दुमाला असे एकत्रित मा शेरावाली पाटस या ठिकाणी रात्री दारू पिण्यास एकत्र असल्याचे व नंतर त्यांचे त्या ठिकाणी भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी मनोज उर्फ मारुती प्रकाश निंबाळकर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील तपास केला असता त्यांनी पाटस सर्विस रोड ला भांडणे झाल्याची कबुली दिल्याने त्यास दिं 7/4/2021रोजी अटक करून त्याची पोलिस कस्टडी घेऊन त्याच्याकडील तपास केला असता त्याचे मित्र सतीश काशिनाथ भोसले राहणार वरवंड तालुका दौंड तसेच सागर दाभाडे राहणार गणेगाव दुमाला तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली
त्यानंतर दिनांक 10/ 4 /2021 रोजी पोलीस निरीक्षक सचिन पाटील व डीबी पथकाने शिताफीने तसेच गुप्त बातमीदार यांच्यामार्फत आरोपी नामे सतीश काशिनाथ भोसले रा. वरवंड भिगवण ता. इंदापूर जि. पुणे येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आरोपी नामे सतीश भोसले यांनी सदर गुन्हा त्याच्या साथीदार सतीश भोसले व सागर दाभाडे याच्या मदतीने दिनांक 1 /3 /2021 रोजी जुने भांडणाच्या कारणावरून मयत प्रशांत उर्फ हर्षद निंबाळकर याच रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पाटस गावच्या हद्दीत पाटस टोल नाक्या कडून पाटस गावात जाणारे सर्विस रोड असलेले ओम तारा बिअर बार परमिट रूम समोर रोडवरती मयतास अडवून मारहाण करून त्यानंतर त्यास आरोपी सतीश भोसले सागर दाभाडे यांनी त्यांच्या जवळील मोटरसायकल वरती मध्यभागी बसून टोलनाक्यावरून पुढे तालुका इंदापूर जिल्हा पुणे भीमा नदीच्या पाण्याच्या पुलावरून येऊन त्या ठिकाणी असलेल्या कट्ट्यावरती बसवलं त्या ठिकाणी त्याचे प्लास्टिक पट्ट्यांनी दोन्ही हात व पाय बांधून त्यात नदीपात्रात टाकून देऊन परवा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा खून केला गुन्ह्यातील आरोपी मनोज उर्फ मारुती प्रकाश निंबाळकर राहणार गणेगाव दुमाला व सतीश काशिनाथ भोसले राहणार वरवंड हे अटक करण्यात आले आहेत व सागर नवनाथ दाभाडे राहणार गणेगाव हे फरारी आहे,आरोपी वरती दौंड यवत व श्रीगोंदा पोलीस ठाणे मध्ये गुन्हे दाखल आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
You cannot copy content of this page
%d bloggers like this: