अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील व चालू वर्षात मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत चाळीसगाव शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तब्बल ५२ गहाळ मोबाईल हस्तगत करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
सदर प्रकरणात मा. पोलीस अधीक्षक जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सौ. कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मासिक क्राईम मीटिंगमध्ये गहाळ मोबाईल शोधण्याबाबत दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्यात आली. मोबाईल धारकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून एकूण ५२ मोबाईल, अंदाजे किंमत ६ लाख ७६ हजार रुपये, हस्तगत करण्यात आले.
हे सर्व मोबाईल दिनांक २५ मार्च २०२६ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही उल्लेखनीय कामगिरी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कर्मचारी गोपाल पाटील, नरेंद्र चौधरी, मोहन सूर्यवंशी तसेच जळगाव सायबर पोलीस स्टेशनचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी संयुक्तपणे पार पाडली.
या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, चाळीसगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे.
