अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील धानोरा खु. येथील रहिवासी फिर्यादी शालिक पाटील यांच्या मालकीची हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH-19 AK 0207) चोरीस गेल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरीत्या उघडकीस आणत चोरीस गेलेले वाहन हस्तगत केले आहे.
फिर्यादी शालिक पाटील हे कामानिमित्त जळगाव शहरातील काशिनाथ चौक परिसरात आले होते. त्यांनी आपली दुचाकी पार्क करून खरेदीसाठी गेल्यानंतर परत आल्यानंतर पार्किंगच्या ठिकाणी वाहन आढळून आले नाही. अज्ञात इसमाने दुचाकी चोरी केल्याची खात्री झाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 66/2026, भा.न्या.सं. 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर जाधव व राजेंद्र पाटील यांच्या सहकार्याने तपास करत संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. दिनांक 01/02/2026 रोजी संशयित आरोपी आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याने हा गुन्हा आपला साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) याच्या मदतीने केल्याचे सांगितले.
त्यानुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी (MH-19 AK 0207) हस्तगत करण्यात आली.
आरोपी आतिष जितेंद्र पोथीवाल, रा. कांचन नगर, जळगाव,गणेश लक्ष्मण कोळी, रा. साकेगाव, ता. भुसावळ
यांना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव), नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग) यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.उपनि. राहुल तायडे, पो.उपनि. चंद्रकांत धनके, पो.ह.प्रमोद लाडवंजारी, पो.ह. गिरीश पाटील, पो.कॉ. गणेश ठाकरे, राहुल घेटे व योगेश घुगे यांनी केली.
