अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी):चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत चालू वर्षात तसेच आतापर्यंत गहाळ झालेल्या मोबाईलबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी प्रभावी कार्यवाही करत एकूण सहा गहाळ मोबाईल हस्तगत केले आहेत.
मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. सौ. कविता नेरकर (अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव) व मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग) यांनी मासिक क्राईम मिटिंगदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली.
मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे तपास करून सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल संच हस्तगत करण्यात आले.हस्तगत करण्यात आलेले मोबाईल आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक मा. सौ. कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या हस्ते संबंधित मूळ मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
ही उल्लेखनीय कामगिरी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन पाटील, सहायक फौजदार युवराज नाईक, पोहेकॉ संदीप पाटील, पोकॉ विजय पाटील तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. नागरिकांनी गहाळ मोबाईलबाबत तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन यावेळी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
