oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-खरजई नाका–तरवाडे रस्त्यावर आज सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई केली. सर्कल अधिकारी प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली तलाठी धीरज देशमुख व विशाल सोनार यांच्या पथकाने लाल रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतूक रंगेहाथ पकडली.
प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तत्काळ जागेवर जात संशयित ट्रॅक्टर–ट्रॉलीची तपासणी केली असता अंदाजे एक ते दीड ब्रास वाळू ट्रॉलीत आढळून आली असून कोणतेही वैध परवाने अथवा वाहतूक कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे सदर वाहन जप्त करण्यात आले.

कारवाईनंतर ट्रॅक्टर व ट्रॉली प्रशासकीय कार्यालयात जमा करण्यात आली असून संबंधित चालक व मालकाविरोधात महसूल कायद्यानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असून नदीपात्रे, रस्ते व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कडक भूमिका घेतली पाहिजे.
दरम्यान, परिसरात अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी वाढत असून महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात यापुढेही नियमित तपासण्या व अचानक कारवाया सुरू ठेवाव्यात अशी मागणी नागरिकांडून जोर धरू लागली आहे.
