अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी):-बहुजन समाज पार्टी, दौंड विधानसभेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “कही हम भूल न जाए” या उपक्रमान्वये १९० वी जयंती साजरी केली, सदर प्रसंगी आयु. राजू गायकवाड, विधानसभा अध्यक्ष, बसपा, आयु.गोरख ननावरे, उपाध्यक्ष, विधानसभा, बसपा, आयु.सचिन काकडे, महासचिव, विधानसभा, बसपा, आयु.अमनभाई खान, कोशाध्यक्ष, बसपा, तसेच आयु.निसारभाई शेख, आयु.मुनीरभाई खान, आयु.उमाकांत कांबळे, आयु.अनिल थोरात, आयु.राजू बडेकर, आयु.धनंजय पोळ बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.
