अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
राष्ट्रीय कन्याशाळेत एसटी डेपो तर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मोफत पास वाट
चाळीसगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय कन्याशाळा व ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव येथे दि. २४ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता एसटी डेपो चाळीसगाव तर्फे ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत बस पास वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. अनिता पाटील, उपप्राचार्य दादासाहेब श्री. रविंद्र शेषराव रणदिवे, एसटी डेपोचे श्री. विजय चव्हाण, श्री. राजपूत साहेब, उपशिक्षक श्री. राहुल पाटील व शाळेच्या परिवहन समितीचे प्रमुख श्री. उद्धव राजेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोफत पास वाटपासाठी श्री. उद्धव राजेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांना उपशिक्षक श्री. राहुल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. यामुळे अनेक विद्यार्थिनींना दररोजच्या प्रवासाचा आर्थिक भार कमी होणार असून शिक्षणात सातत्य राखणे शक्य होईल.
