अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- तालुका वि.का. सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालक मंडळाची पहिली मासिक बैठक दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिवनेरी प्लाझा, चाळीसगाव येथे संस्थेचे कार्यालयात उत्साहात पार पडली. संस्थेचे चेअरमन किसनराव जोर्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन हिम्मत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत विषयपत्रिकेवरील विविध मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण कारागिरांचा विशेष मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणे, कर्ज पुरवठा सुलभ करणे आणि भविष्यात “ग्रामोद्योग संकुल” उभारण्याचा संकल्प यावेळी पारित झाला.
या बैठकीस संचालक संजय सोनार, शालीग्राम कुंभार, अनिल बोरसे (वाघळी), संदीप चव्हाण, दिलीप पवार, दगडू ढगे, गणेश सोनवणे (टाकळी प्र.चा), सौ. सुनंदा खलाणे, सौ. संगीता मांडोळे यांची उपस्थिती होती. तसेच भीमराव खलाणे, कैलास मांडोळे, महेंद्रसिंग सूर्यवंशी, हेमराज सूर्यवंशी, बबलू अहिरे, लक्ष्मण वाघ हे मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष हिम्मत निकम व सचिव आर. आर. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. संचालक संदीप चव्हाण, दिलीप पवार, अनिल बोरसे, संजय सोनार, सौ. सुनिता खलाणे आणि व्हाईस चेअरमन यांनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. चेअरमन किसनराव जोर्वेकर यांनी या सर्व सूचनांची नोंद घेत त्या ग्रामीण कारागिरांच्या हिताच्या असल्याचे नमूद करून लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.
