अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– रोटरी कम्युनिटी कोर्पस चाळीसगाव क्लासिकच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली.
अध्यक्षपदी ॲड. आकाश पोळ यांची निवड करण्यात आली असून,

सचिवपदी हर्षल माळी यांची निवड झाली आहे.
सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता, डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. या निवडीमुळे संस्था अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
इतर पदाधिकारीपदांसाठी झालेल्या निवडीनुसार –उपाध्यक्षपदी महेंद्र कुमावत,खजिनदार खुशाल पाटील,सहसचिव प्रेरणा रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर बोर्ड मेंबर्स म्हणून शुभम महाजन, प्रणाल पवार, साहिल आव्हाड, तुषार पाटील, आणि राकेश त्रिभुवन यांची निवड झाली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे आगामी काळात संस्था अधिक प्रभावीपणे समाजोपयोगी उपक्रम राबवेल, असा विश्वास रोटरी परिवारात व्यक्त करण्यात येत आहे.
