अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) – चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची प्रशासकीय कारणास्तव पाचोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शंकर मुटेकर यांच्याकडे ग्रामीण ठाण्याचा चार्ज सोपवण्यात आला आहे.
राहुलकुमार पवार यांनी चाळीसगाव ग्रामीण परिसरात गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई तसेच पोलिसिंगच्या माध्यमातून चांगले योगदान दिले होते. त्यांच्या बदलीची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती, जी आता प्रत्यक्षात आली आहे.
दरम्यान, ग्रामीण ठाण्याच्या नव्या मुख्य अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत सपोनि मुटेकर हे तात्पुरता कार्यभार पाहणार आहेत. बदल्यांमुळे पोलीस कामकाजात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आता ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक पदी कोणाची वर्णी लागते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे.
