मागील वर्षाचा आमदार मंगेश चव्हाण यांचा सपत्नीक चिमुकल्या वारकऱ्यांसोबत असलेला फोटो
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
पंढरपूर(प्रतिनिधी)- चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे सपत्नीक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर वारीत मागच्या वर्षी सहभागी झाले होते, त्यांनी चंद्रभागा नदीच्या तिरी चिमुकल्या वारकऱ्यांबरोबर काही अविस्मरणीय क्षण अनुभवले.
वारीच्या या पवित्र वातावरणात, हजारो वारकऱ्यांच्या श्रद्धेने भारावलेल्या पंढरपूर नगरीत आमदार चव्हाण स्वतः सहभागी झाले. त्यांनी पत्नींसह चंद्रभागेच्या घाटावर जाऊन दर्शन घेतले, आणि वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. विशेषतः लहान वयातील चिमुकल्या वारकऱ्यांच्या डोळ्यांत झळकणारी भक्ती आणि विठ्ठल भेटीची आस पाहून आमदार चव्हाण भावुक झाले होते.
“चंद्रभागेच्या तिरी चिमुकल्या वारकऱ्यांसोबत अनुभवलेले हे क्षण अगदी अविस्मरणीय आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भक्ती, डोळ्यांत झळकणारी श्रद्धा आणि विठ्ठल भेटीची आस पाहून मन भारावून गेलं. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली होती.
पंढरपूर वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. यावर्षी देखील आमदार चव्हाण हे पंढरपूर येते उपस्थित असून येणाऱ्या 12 – 13 तारखेला चाळीसगाव येथून पंढरपूर येथे वारकरी जाणार असल्याने त्या नियोजनासाठी तेथे गेले असून विठ्ठल रुखमाई चे दर्शन घेत पुन्हा चाळीसगाव येथून वारकऱ्यांसोबत पंढरपूर जाणार आहेत.
या लेखात आषाढी एकादशी निम्मित मागील वर्षाची आमदार मंगेश चव्हाण यांच्या सपत्नीक पंढरपूर वारीला उजाळा दिला आहे.
