अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-, ता. ७ जुलै पाटणादेवी रोडवर महेंद्र तात्या राजपूत यांच्या शेताजवळ एक चारचाकी कार पलटी होण्याची घटना आज दुपारी घडली आहे.ही कार पाटणादेवी येथून दर्शन करून परत येत असताना अपघातग्रस्त झाली.
प्राप्त माहितीनुसार, गाडीमध्ये शहरातील रथ गल्ली येथे राहणारे एकूण पाच जण प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत गाडीचे चाक गेल्याने गाडी थेट बाजूच्या नाल्यात जाऊन पलटी झाली.
या अपघातात सुदैवाने कोणालाही कोणतीही शारीरिक दुखापत झालेली नाही. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातानंतर कारचालक आणि इतर प्रवासी सुखरूप असून मोठा अनर्थ टळला.
