अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजने अंतर्गत महा पशुधन सेवा केंद्राची महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात सेवा सुरू केली असून पशुधनासाठी वैद्यकीय सेवा आता एका फोन कॉल वर उपलब्ध होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील पशुपालकांसाठी देखील ही अत्यंत दिलासादायक वृत्त असून शासनाने सुरू केलेल्या या सेवेचा लाभ घ्यावा असे जळगाव जिल्हाधिकारी यांनी सोशल मीडिया द्वारे कळविले आहे.
आता आपल्या गावातील कोणत्याही पशूला वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास, फक्त 1962 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल केल्यास तात्काळ मदत मिळणार आहे.
ही सेवा 24×7 सुरु असून, कोणत्याही वेळेस पशूंच्या आरोग्यासंदर्भात मदत मिळू शकते. जिल्ह्यातील पशुपालक बंधू-भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे शासनाकडून देखील आवाहन करण्यात आले आहे.
पशूंच्या आरोग्यासाठी ही एक महत्त्वाची सुविधा असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा.
“‘पशू वैद्यकीय सेवा तुमच्या दारी – तातडीने मदतीसाठी सज्ज!'”झाली आहे.
हा नंबर लक्षात ठेवा आणि इतरांसोबत शेअर करा — 1962
