अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
सर्वज्ञ कॉम्प्युटर्सतर्फे नगरपरिषद मराठी शाळा क्र. ४ ला संगणक भेट – विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी
चाळीसगाव (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत सर्वज्ञ कॉम्प्युटर्स, चाळीसगाव यांनी नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक ४ ला संगणक भेट देत विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाच्या दिशेने एक मोलाची भर घातली आहे.
या कार्यक्रमात सर्वज्ञ कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. सतिश पाटील यांनी संगणक संच औपचारिकपणे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री. विलास भोई आणि उपमुख्याधिकारी श्री. आशिष लोकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर साळुंखे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगणक भेट मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा तांत्रिक शिक्षणाकडे ओढा वाढणार असून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययनाची नवी दिशा मिळणार आहे.
या उपक्रमाबद्दल नगरपरिषद शिक्षण विभागातर्फे श्री. सतिश पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले. अशा प्रकारच्या योगदानामुळेच समाजामध्ये शैक्षणिक परिवर्तन घडू शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
