अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. 7 जुलै २०२५ तालुक्यातील करगाव तांडा क्रमांक ०३ येथील ग्रामस्थांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेले देवी मोती माता मंदिर चोरट्यांच्या निशाण्यावर गेले असून,अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील व डब्यातील सोनं-चांदीचे एकूण ७२,७०० रुपयांचे दागिने चोरीला नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या प्रकरणी नंदलाल चरणदास चव्हाण यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून,मंदिराचे कुलूप तोडून चोरी केल्याचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
देवस्थानात शिरून चोऱी
सदर देवी मंदिर हे नामदेव पुना चव्हाण यांच्या शेतामध्ये सार्वजनिक वर्गणीतून उभारण्यात आले असून, गेल्या काही वर्षांपासून नंदलाल चव्हाण व त्यांची आई सुशीलाबाई चव्हाण देवीची पूजा-अर्चा करत होते. मंदिरात गावकऱ्यांच्या दानातून सोन्या-चांदीचे दागिने देवीच्या मूर्तीवर चढवण्यात आले होते. मंदिर कायम कुलूपबंद ठेवले जाते.
दि. ७ जुलै रोजी दुपारी 12 वाजता नंदलाल चव्हाण यांच्या आई सुशीलाबाई देवीची सेवा करून संध्याकाळी 6 वाजत परत घरी आल्या.त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 6.30 वाजता नंदलाल चव्हाण व त्यांच्या आईने पुन्हा मंदिरात जाऊन देवीच्या मूर्तीवरील नथ बदलली व काही दागिने डब्यात ठेवले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मंदिर कुलूप लावून बंद केले.
केवळ १ तासात चोरीचा धक्कादायक प्रकार
रात्री ८.१५ वाजता गावातील नामदेव पुना चव्हाण यांचा फोन आला की, “मंदिराचा दरवाजा उघडा दिसतोय, लवकर ये”. तेव्हा नंदलाल चव्हाण भाऊ सुखदेव चव्हाण व गोकुळ चव्हाण यांनी तातडीने मंदिर गाठले असता, मंदिराचे स्टील दरवाजाचे कुलूप तुटलेले होते आणि देवीच्या मूर्तीवरील व डब्यातील सर्व दागिने चोरीला गेले होते.
कोणती दागिने चोरीला गेली?
चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तूंची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1 चांदीचा मुकुट 250 ग्रॅम ₹17,500
2 चांदीचा कमरपट्टा 200 ग्रॅम ₹14,000
3 चांदीची 8 कडे 100 ग्रॅम ₹7,000
4 चांदीचा त्रिशूल 50 ग्रॅम ₹3,500
5 चांदीची अंगठी 10 ग्रॅम ₹700
6 सोन्याच्या 2 नथ 2 ग्रॅम ₹12,000
7 सोन्याचे 4 मणी 2 ग्रॅम ₹12,000
8 सोन्याचे डोरले 1 ग्रॅम ₹6,000
एकूण — — ₹72,700
गावात संताप – चोरट्यांचा शोध सुरू
या चोरीमुळे गावात प्रचंड संताप व हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या श्रद्धेचा केंद्र असलेल्या देवस्थानात घडलेली ही चोरी अत्यंत निंदनीय असल्याची भावना लोकांतून व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल होताच अज्ञात चोराचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
