अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी):चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील मंदिरांचे ट्रस्टी, पुजारी, तसेच मशीदचे मौलाना आणि दर्ग्यांचे ट्रस्टी सहभागी झाले होते.
चाळीसगाव : एमआयडीसी परिसरातील कपाशी गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान
या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे होते. पोलीस निरीक्षक मनेळ यांनी यावेळी सर्व धार्मिक प्रतिनिधींना कायद्याचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला.
बैठकीत हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.या बैठकीला शहरातील विविध धार्मिक संस्थांचे सुमारे 80 ते 100 प्रतिनिधी उपस्थित होते. चाळीसगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे.
