अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – गेले एक महिना रिक्त असलेले चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदावर अखेर नियुक्ती झाली असून, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील हे शांत, संयमी, शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी अनेक ठिकाणी यशस्वी सेवा बजावली असून, त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये तसेच पोलिस प्रशासनात जवळीक निर्माण होईल,ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नव्याने रुजू होणारे निरीक्षक पाटील यांच्याकडून स्थानिक जनता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
गेल्या काही काळात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी प्रभारी म्हणून उत्तम रित्या कामकाज पाहिले.मात्र आता निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या अनुभवाचा लाभ ग्रामीण ठाण्याला होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
