अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा व शहरात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील हरीविठ्ठल नगर परिसरात पत्याचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड; ५० किलो तारासह मुद्देमाल जप्त
या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने ८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता छापा टाकून नऊ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल फोन असा एकूण ₹३,१४,३४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ कलम १२(अ) अंतर्गत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व पोलीस कर्मचारी अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांच्या पथकाने केली.
