अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) –श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दि. १ सप्टेंबर रोजी ‘आपलं विद्यालय – आपला स्वाभिमान’ या संकल्प दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी ज्ञान, संस्कार, शिस्त व परंपरा या उच्च मूल्यांचे पालन करण्याचे संकल्प घेतले.
याच कार्यक्रमात शाळेच्या उपशिक्षिका सौ. शितल कोळी यांना संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते “सेवा सन्मान 2025” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आपल्या भाषणात शासनाच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी व विद्यालय यांच्यातील आत्मीय नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रूपाली आव्हाड यांनी केले. या प्रसंगी उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, कविता वंजारी, साधना शिरसाट, सरला पाटील, शारदा तडवी, सुवर्णा पाटील, दिनेश पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.
