अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टँड परिसरात काल दिनांक 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री गोळीबार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेत जखमी असलेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या कडून घटनेची माहिती घेत गुन्हा दाखल केला जाणार आहे.नेमक तरुण जखमी होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय अहवालानंतर माहिती समोर येणार आहे.
दरम्यान, शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवत,घटनास्थळी सखोल पाहणी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देखील तपासले जाऊ शकतात.
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, यात कोण सहभागी होते, कुणाला लक्ष्य करण्यात आले होते का, याबाबत पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास केला जात आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कलमान्वये लवकरच गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी,तसेच काही माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश माळी करत आहेत.
