oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: शहरातील रेल्वे पुलावर सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अर्जुन अनिल नरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी पूनम अर्जुन नरवाडे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन नरवाडे व त्यांची पत्नी बाजार करून घरी परतत असताना हा अपघात घडला. नरवाडे दाम्पत्य हे मूळ जामनेर येथील रहिवासी असून कामानिमित्त चाळीसगाव येथील डेराबर्डी परिसरात वास्तव्यास होते.
दरम्यान, अपघाताच्या वेळी रेल्वे पुलावरून जात असलेले चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन वाल्हे यांनी तत्काळ घटनास्थळी थांबत घटने स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या सहकाऱ्याने मदतकार्य सुरू केले. त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्सला पाचारण करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीसांकडून सुरू आहे.
