अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी):चाळीसगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने (भाजपा) ३६ पैकी २४ जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. शहर विकास आघाडीने १० जागांवर यश मिळवले असून २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १ अ मधून भाजपाचे राजपूत करणसिंग ईश्वरसिंग हे २,२४६ मते मिळवत ३८१ मतांच्या फरकाने विजयी झाले. १ ब मधून भाजपाच्या पाटील मनीषा शेखर यांनी २,२६६ मते घेत २८१ मतांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक २ अ मधून शहर विकास आघाडीचे म्हस्के राहुल यांनी १,३८० मते मिळवत २२५ मतांनी बाजी मारली, तर २ ब मधून विकास आघाडीच्या पाटील मोरे वैशाली या १,५३७ मते घेत ९३ मतांच्या फरकाने विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक ३ अ मधून शहर विकास आघाडीचे दीपक पाटील हे १,२६१ मते मिळवत अवघ्या ३५ मतांनी विजयी झाले. ३ ब मधून भाजपाच्या शिरुडे स्वाती यांनी १,७१६ मते घेत ७१६ मतांच्या फरकाने विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ४ अ मधून भाजपाचे हर्षल चौधरी यांनी २,२८६ मते मिळवत तब्बल १,६९९ मतांनी मोठा विजय मिळवला, तर ४ ब मधून भाजपाच्या कोठावदे प्राजक्ता या १,८५७ मते घेत ८७१ मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक ५ अ मधून भाजपाच्या चौधरी रूपाली प्रभाकर यांनी २,६९० मते घेत १,४३२ मतांनी दणदणीत विजय मिळवला. ५ ब मधून भाजपाचे जाधव युवराज भीमराव हे १,७७८ मते मिळवत १,०७० मतांनी विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ६ अ मधून भाजपाचे खंडेलवाल योगेश श्रीनिवास यांनी १,६३८ मते घेत २७१ मतांनी विजय मिळवला, तर ६ ब मधून भाजपाच्या पाटील योजना धनंजय या १,४९० मते मिळवत १०६ मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक ७ अ मधून शहर विकास आघाडीच्या राखुंडे स्वाती यांनी २,०३५ मते मिळवत ५७७ मतांनी विजय मिळवला. ७ ब मधून अपक्ष चौधरी राजेंद्र रामदास यांनी १,४२८ मते घेत ३७३ मतांच्या फरकाने बाजी मारली.
प्रभाग क्रमांक ८ अ मधून भाजपाच्या कारडा पायल विशाल यांनी १,०९६ मते मिळवत १३९ मतांनी विजय मिळवला, तर ८ ब मधून भाजपाचे राजपूत सोमसिंग देवसिंग हे १,६७५ मते घेत ६८५ मतांनी विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ९ अ मधून शहर विकास आघाडीच्या पवार विजया प्रकाश विशाल या १,४४२ मते मिळवत २०२ मतांनी विजयी झाल्या, तर ९ ब मधून शहर विकास आघाडीच्या अहिरे पूनम धनंजय यांनी १,६४० मते घेत ५०२ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक १० अ मधून भाजपाच्या मराठे भारती प्रवीण यांनी १,५७२ मते मिळवत २९३ मतांनी विजय मिळवला. १० ब मधून भाजपाचे गवळी संभाजी शिवाजी हे १,३६८ मते घेत ५७७ मतांनी विजयी झाले.
प्रभाग क्रमांक ११ अ मधून भाजपाच्या पवार हर्षदा बाळू यांनी १,९१६ मते मिळवत ६७३ मतांनी विजय मिळवला, तर ११ ब मधून भाजपाचे वाघ अभय विनायक हे १,४३७ मते घेत २६७ मतांनी विजयी झाले.
प्रभाग क्रमांक १२ अ मधून भाजपाचे चौधरी अनिल वाल्मीक यांनी २,०८१ मते मिळवत ६०८ मतांनी विजय मिळवला. १२ ब मधून अपक्ष जाधव सायली रोशन या २,३६७ मते घेत १,१८५ मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक १३ अ मधून भाजपाचे मिर्झा फकिरा बेग जमलं बेग यांनी २,३५० मते मिळवत १,६२६ मतांनी विजय मिळवला, तर १३ ब मधून भाजपाच्या चौधरी मेघा मुकेश यांनी १,८९८ मते घेत १,२४७ मतांनी बाजी मारली.
प्रभाग क्रमांक १४ अ मधून शहर विकास आघाडीचे शेख इमरान शब्बीर हे २,००६ मते मिळवत अवघ्या २५ मतांनी विजयी झाले. १४ ब मधून भाजपाच्या खान रुबीना अमजद यांनी १,९६५ मते मिळवत १९१ मतांनी विजय मिळवला.
प्रभाग क्रमांक १५ अ मधून भाजपाचे शेख वसीम रज्जाक यांनी १,३१० मते मिळवत ८८ मतांनी विजय मिळवला, तर १५ ब मधून भाजपाच्या चौधरी नलिनी अमोल या १,६६४ मते घेत ८४४ मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक १६ अ मधून शहर विकास आघाडीचे देशमुख अभिषेक राजीव यांनी १,८२१ मते मिळवत ७७५ मतांनी विजय मिळवला. १६ ब मधून राजपूत राजश्री दीपक या १,८०६ मते घेत ६७८ मतांनी विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक १७ अ मधून भाजपाच्या राजपूत उज्वला विशाल यांनी १,६३० मते मिळवत ५४४ मतांनी विजय मिळवला, तर १७ ब मधून भाजपाचे कुमावत प्रशांत शामराव हे २,१०६ मते घेत ९३२ मतांनी विजयी झाले.
प्रभाग क्रमांक १८ अ मधून भाजपाचे बच्चे धर्मा अनिल यांनी ७९२ मते मिळवत १०९ मतांनी विजय मिळवला, तर १८ ब मधून शहर विकास आघाडीच्या ठाकूर सविता सूर्यकांत यांनी १,१३६ मते मिळवत १४४ मतांनी बाजी मारली.
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपाच्या प्रतिभा चव्हाण यांनी ३२,२३८ मते मिळवत शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख (२६,२२६ मते) यांचा ६,०१२ मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पद मिळविले आहे.
