व्यापारी बांधवांच्या पाठीशी खंबीर – खासदार उन्मेश पाटील यांची किराणा भुसार व्यापारी असोशिएशन पदाधिकाऱ्यांना ग्वाही.

0 0
Read Time3 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव – कोरोना सारख्या महामारीत जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन किराणा व्यावसायिकांनी आपली लहान मोठी दुकाने शासनाच्या नियमानुसार व आदेशाचे पालन करीत वेळोवेळी सुरू ठेवली आहेत आणि वेळोवेळी बंद देखील ठेवली आहे. असे असताना शहरात तोतया पंटर नगरपरिषदेचे पावती पुस्तक घेऊन व्यापाऱ्यांना धमकावत असल्याचा प्रकार मला आत्ताच व्यापाऱ्यांनी सांगितला आहे. याबाबत तातडीने चौकशी होऊन संबंधित तोतया पंटरला अटक करून नगरपरिषदेचे पावती पुस्तक अधिकृत आहे की अनधिकृत आहे यासह सर्व बाबींचा खुलासा तातडीने करावा असे आदेश संबधित यंत्रणेला देत व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करीत आपला व्यवसाय करावा मी आपल्या खंबीरपणे पाठीशी असल्याची ग्वाही खासदार उन्मेशदादा पाटील यांनी चाळीसगाव शहरातील व्यापारी किराणा भुसार असोसिएशनचे सदस्यांनी दिली.
आज खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी काल शहरात तोतया पंटर कडून किराणा व्यवसायिकांना शिवराळ भाषेत वर्तन करून दंडाच्या पावती देण्याची घटना घडली होती या अनुषंगाने भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी आज खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, शहर पोलीस निरीक्षक, तहसीलदार,जिल्हा पोलीस उपअधीक्षक यांच्याशी चर्चा करून झालेली घटना गंभीर असून तातडीने पावले उचलावी असे आदेश दिले. तसेच या संदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांना देखील पत्राद्वारे आली आहे. खासदार पाटील यांनी व्यापाऱ्यांना हिम्मत देऊन आपण आपला व्यवहार,व्यवसाय प्रामाणिकपणे करावा.मी तुमच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिलासा दिला. याप्रसंगी किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख,सचिव श्यामभाऊ अहिरे ,संचालक राजेंद्र पाटणी, राहुल करवा, धणपती रताणी, अजय वाणी, जितेंद्र शिरोडे,प्रदीप चौधरी, नाना पुरकर, जितेश गुप्ता, जितेंद्र जैन, भावेश कोठावदे, सोमनाथ ब्राह्मणकर, जितेंद्र देसले,लक्ष्मण घुसे, श्याम वाणी, अनिकेत शहा, सराफा असोशीएशनचे व्यापारी सुनील सराफ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.यावेळी आम्ही पुकारलेला बंद मागे घेत आहोत. अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.