अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री.सतिष पाटील यांनी प्रतिमा पूजन केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे अधिक्षक श्री.विनोद देसले यांनी ध्वजारोहण केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत लेझीम पथक, ढोल पथक, कवायत त्याचप्रमाणे विविध नृत्य, गीत, गायन व वक्तृत्व सादर करण्यात आले. शाळेतील शिक्षक प्रशांत पाटील यांनी स्वातंत्र दिनाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक, अधिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद सूर्यवंशी, दिपमला जाधव, भूषण बहीरम व सर्व शिक्षक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार जितेंद्र सुर्यवंशी यांनी मानले.
