
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळी येथील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील क्रीडा शिक्षक श्री. शरद सूर्यवंशी, श्री. साहेबराव निकम व श्री. भूषण बहिरम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, फायदे व दैनंदिन जीवनातील उपयोग याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. योगाभ्यासाद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कसे साधता येते, याची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश पाटील, अधिक्षक श्री. विनोद देसले, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन पाटील यांनी केले.