
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक 21 जून 2025 रोजी श्री अण्णासाहेब उदेसिंग पवार सर्वोदय आश्रम शाळा वरखेडे बु. तालुका चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होतो, म्हणून प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा” हा मौलिक संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर यांनी योग दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे फायदे समजावले. यानंतर श्रीमती सविता जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष योगासने करून दाखवत त्यांना विविध योगाभ्यास करून घेतला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. सर्वांनी योग दिनाचा आनंद घेत विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्याची दिशा दाखवली.
“करो योग.. रहो निरोग..” चा नारा देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.