
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) — भारतीय जनता पार्टी चाळीसगाव शहर व ग्रामीण मंडळातर्फे संपूर्ण मतदारसंघात राबविण्यात येत असलेल्या “एक पेड माँ के नाम” या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज चाळीसगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः सहभाग घेत झाडे लावली तसेच नागरिकांशी संवाद साधला. “ही केवळ पर्यावरण संवर्धनाची नाही, तर आपल्या आईप्रतीच्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची जाणीव जागवणारी सुंदर सामाजिक चळवळ आहे,” असे आमदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले आहे की – “आईप्रतीचे आपले प्रेम एका झाडाच्या रूपाने व्यक्त करा. हे झाड केवळ आईची आठवण नाही, तर पर्यावरणासाठीही एक अमूल्य देणगी ठरेल.”
या कार्यक्रमाला चाळीसगाव शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांच्या या सहभागाबद्दल आमदार चव्हाण यांनी विशेष आभार व्यक्त केले व असेच योगदान पुढेही देण्याचे आवाहन केले. “चला, आपण सर्वजण मिळून या अभियानास अधिक व्यापक रूप देऊया,” असेही त्यांनी सांगितले.