
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव (प्रतिनिधी) — जागतिक योग दिनानिमित्त चाळीसगाव शहरातील आरके लॉन्सजवळील शिवनेरी उद्यान येथे परिसरातील नागरिकांच्या वतीने भव्य योगासन शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष उपस्थिती लाभली.आयोजकांनी यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देत आयोजकांनी सत्कार केला.यावेळी आमदार चव्हाण यांनी उपस्थितांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देत योग साधनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकते आणि समाजातील आरोग्यदृष्ट्या सकारात्मक बदल घडतो.”
सदर कार्यक्रमास जेष्ठ नागरिक, माता भगिनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. योगाविषयीची वाढती जागरूकता आणि सहभाग पाहता ‘फिट चाळीसगाव’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे आकार घेत असल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.