चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक 28 जून रोजी चाळीसगाव शहराचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी बहुजन आझाद सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष समाजरक्षक स्वप्नील जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
महापुरुषांच्या जयघोषणे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आंदोलकांनी दणाणून सोडत,रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी सर्व पक्षीय व धर्मियांची उपस्थिती होती.हे आंदोलन शांततेत पार पडले.
शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात हजारो आंदोलकांनी सहभागी होत आपल्या भावना रास्ता रोको करत तीव्रतेने मांडल्या. आंदोलनामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी मागणी करत आंदोलकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत पायी मिरवणूक काढून चौकात ठिय्या मांडला. त्यामधून आंदोलकांच्या ठाम भूमिकेचा प्रत्यय आला.
या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार मंगेश चव्हाण स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधला आणि 45 दिवसांच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे नियोजित जागेवर भूमिपूजन करत पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची हमी दिली.
आंदोलनकर्त्यांनी आमदारांच्या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनावेळी पोलिस निरीक्षक (ग्रामीण) राहुल पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सोबत आंदोलकांच्या मागणी समजून घेण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी उपस्थित होते.
यावेळी रामचंद्र जाधव, रोशन जाधव, संभा जाधव,नितीन मरसाळे, आबा गरुड, गौतम जाधव, बबलू जाधव,सागर निकम, वसीम चेअरमन यांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला समाजातील मान्यवर, भीमसैनिक, बहुजन आझाद सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले, मात्र प्रशासनाला आंदोलन लक्षात राहील, असा सूर अनेकांनी मांडला.
दीड ते दोन तास वाहतूक ठप्प, आंदोलकांचा ठाम निर्धार
शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात हजारो आंदोलकांनी सहभागी होत आपल्या भावना रास्ता रोको करत तीव्रतेने मांडल्या. आंदोलनामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक संपूर्णपणे ठप्प झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारला जावा, अशी मागणी करत आंदोलकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळून छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत पायी मिरवणूक काढून चौकात ठिय्या मांडला. त्यामधून आंदोलकांच्या ठाम भूमिकेचा प्रत्यय आला.
आमदार मंगेश चव्हाण यांची तत्काळ भेट, 45 दिवसांत भूमिपूजनाचे आश्वासन
या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार मंगेश चव्हाण स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधला आणि 45 दिवसांच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे नियोजित जागेवर भूमिपूजन करत पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची हमी दिली.
आंदोलनकर्त्यांनी आमदारांच्या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आंदोलन मागे घेतले.
प्रशासन आणि सामाजिक नेतृत्वाची उपस्थिती