
नामांकित कंपनीच्या नावाने नकल करून तंबाखू विक्री,दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील पिरमुसा कादरीनगरात मे. . एच.एच. पटेल कंपनीचे सुर्य छाप टोटा या ब्रॅण्डची नकल करून अवैधरीत्या विकल्या जात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली असता पोलीसांनी छापा टाकून १ लाख २० हजारांचे मुद्देमाल जप्त करून दोन जणांवर कारवाई केली असून आरोपिंना ताब्यात घेण्यात आले आहे
सविस्तर वृत्त असे की, मे. एच.एच. पटेल कंपनीत सुर्य छाप टोटा या ब्रॅण्ड नावाने तंबाखू उत्पादन करण्यात येत असून दोन कारखाने एक नागद रोडवर व दुसरा कन्नड रोडवरती आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या कंपनीच्या नावाने नकली सुर्य छाप टोटा या ब्रॅण्ड नावाने निकृष्ट दर्जाचे तंबाखू उत्पादन करून सर्रासपणे विक्री होत असल्याचे संशय कंपनीचे व्यवस्थापक नवीन परमानंद हरीयाणी यांना आली. यावर त्यांनी अधिक माहिती घेतली असता शहरातील पिरमुसा कादरीनगर, त्रिमूर्ती बेकरीजवळ बेकायदेशीरपणे नकली तंबाखू कंपनीच्या नावाने उत्पादन करून सर्रासपणे विक्री होत असल्याचे कळताच त्यांनी याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
त्यावर सपोनि नि.अ.सैय्यद, दिपक पाटील, निलेश पाटील व अमोल पाटील यांनी सदर ठिकाणी रात्री १:३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता १,२०,००० हजार रुपये किंमतीचे १२ गोण्या मिळून आले. २०० रूपये प्रमाणे एकूण ६०० नग पुढे मिळून आले. एकूण १,२०,००० हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केले आहे. यावेळी इरफान अक्रमबेग मिर्झा (वय-३८) व रिजवान शेख नजीर (वय-२३) दोघेही रा. पिरमुसा कादरीनगर, त्रिमूर्ती बेकरीजवळ ता. चाळीसगाव यांवर कारवाई करण्यात आली आहे.
व्यवस्थापक नवीन परमानंद हरीयाणी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ४२०,२६२,२७३,४८६,४८७,४८८ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि नि.अ.सैय्यद हे करीत आहेत.
Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating