अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी) —चाळीसगाव नगरपालिकेच्या राजकारणात येत्या १३ तारखेला निर्णायक घडामोडी घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उपनगराध्यक्ष पदाचा बहुप्रतिक्षित निर्णय आणि त्याच दिवशी स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता असल्याने, नगरपालिकेचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.
या निवड प्रक्रियेत स्वीकृत नगरसेवकांसाठी सादर होणारी शिफारस पत्रे व सह-अर्हतेची कागदपत्रे याची छाननी ही महत्त्वाची जबाबदारी प्रांत अधिकारी प्रमोद हिले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
नियमांच्या चौकटीत होणारी ही छाननी अनेक इच्छुकांच्या धाकधुकीत भर घालणारी ठरणार का? की सोहिस्कर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आमदार मंगेश चव्हाण हे सर्वसमावेशक आणि संतुलित विचारातून उपनगराध्यक्ष पद देणार असल्याचे वृत्त राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
कोणत्या गटाला संधी मिळणार, कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला डावपेच बदलावे लागणार, यावर सध्या चर्चांना उधाण आले आहे.नगरपालिकेतील सत्तासमीकरणे बदलण्याची क्षमता असलेल्या या निर्णयाकडे सत्ताधारी, विरोधक, इच्छुक नगरसेवक आणि शहरवासीयांचे लक्ष खिळून राहिले आहे. उपनगराध्यक्ष पद आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड केवळ औपचारिक ठरणार की नवे राजकीय समीकरण उभे करणार, याचा निर्णय १३ तारखेला होणाऱ्या नगरपालिका बैठकीत होणार आहे.एकूणच, चाळीसगाव नगरपालिकेत ‘कोणाला मान, कोणाला संधी आणि कोणाला प्रतीक्षा’ याचे उत्तर देणारा दिवस म्हणून १३ जानेवारी ठरू शकतो यात शंका नाही.
