अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगावात रोटरी क्लब व बापजी हॉस्पिटलतर्फे आरोग्यदायी उपक्रम
चाळीसगाव (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स आणि बापजी जीवनदीप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगावकरांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी आरोग्य उपक्रम राबवण्यात येत आहे.
दिनांक ५ जुलै २०२५, शनिवार रोजी सकाळी १० वाजता, बापजी जीवनदीप हॉस्पिटल, चाळीसगाव येथे भव्य रोटरी रॉयल्स आय सेंटरचे लोकार्पण तसेच ५०० मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये:
🔹 अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
🔹 आधुनिक फेको मशीन द्वारे शस्त्रक्रिया
🔹 योग्य रुग्णांवर मोफत ऑपरेशन व लेंस इम्प्लांट सुविधा
हा उपक्रम विशेषतः गरजू व ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, इच्छुक रुग्णांनी खालील क्रमांकावर संपर्क करून आपल्या नावांची नोंदणी करावी:
📞 नोंदणी व संपर्क:
8459841460 / 9284171417 / 9822323362 / 8149343629
जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि गरजूंपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
