अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- हनुमान सिंग राजपूत नगर, चाळीसगाव येथे कार्यरत असलेल्या शौर्य अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या अबॅकस नॅशनल चॅम्पियन कॉम्पिटिशनमध्ये घवघवीत यश संपादन करत चाळीसगाव शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
देशभरातून सहभागी झालेल्या असंख्य विद्यार्थ्यांमध्ये चाळीसगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवान गणिती कौशल्याने आणि अचूकतेने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत शौर्य अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रँक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

फर्स्ट रँक – मेहविश रोहित बागवान आणि राहुल आयुष्य विसपुते यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवले.
सेकंड रँक – राजेश्वरी पंकज गायकवाड आणि पूर्वेश रमेश पाटील यांनी सातत्यपूर्ण अचूक गणना करत दुसरा क्रमांक पटकावला.
थर्ड रँक – परी योगेश जगताप हिने आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत तिसरा क्रमांक मिळवला.
याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्व विद्यार्थ्यांनाही त्यांच्या उल्लेखनीय सहभागाबद्दल व कामगिरीबद्दल आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे पाठबळ तसेच शौर्य अबॅकस क्लासेसचे शिस्तबद्ध व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या नेत्रदीपक यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, पालक, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शौर्य अबॅकस क्लासेसच्या या यशामुळे चाळीसगावमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
