{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- SSC बोर्ड फेब्रुवारी/मार्च 2026 परीक्षेत गुड शेपर्ड अकॅडमीने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचे एकूण 168 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्वच 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये 139 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, 25 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 4 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. या यशामागे शाळेचे प्रिन्सिपल डॅनियल दाखले सर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.
परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चि. सुधांशु हरी शंकर पांडे यांनी 95.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. चि. अभिषेक योगेश कुऱ्हाडे यांनी 95.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. आयुषी निलेश भोसले यांनी 94.60 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. कु. वेदिका संदीपकुमार अमृतकार यांनी 94.00 टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक मिळविला. तसेच चि. अमोघ योगेश जाधव आणि कु. कृष्णा दिनेश दीक्षित यांनी प्रत्येकी 93.60 टक्के गुण मिळवत पंचम क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, प्रिन्सिपल डॅनियल दाखले सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
