{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- राष्ट्रीय विद्यालय मुलांची शाळा चाळीसगाव येथील विद्यार्थ्यांनी एसएससी (SSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये देशमुख रितेश ललित याने 445 गुण प्राप्त करून 89 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. पाटील अभय संतोष याने 434 गुणांसह 86.80 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक पटकाविला, पाटील मोहित सुनील याने 368 गुण व अतिरिक्त 3 गुणांसह 74.20 टक्के मिळविले तसेच चव्हाण चेतन रवींद्र याने 370 गुणांसह 74 टक्के तर गुजर जयदीप देविदास याने 351 गुणांसह 70.20 टक्के गुण प्राप्त केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना दिले असून विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
