Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न विधानसभेत मांडणार-राहुल कुल आमदार दौंड

0
1 0
Read Time4 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली .त्यावेळी हा विषय विधानसभेत मांडणार असल्याची ग्वाही दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली .

याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की , गेल्या दहा वर्षापासून राज्य शासनाने जिल्हास्तरीय जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यालये उघडली असली तरी सहजासहजी जातीची वैधता प्रमाणपत्रे सहजासहजी मिळत नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे घरात एखाद्याचे जातीचे वैधता प्रमाणपत्र असून सुद्धा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवत असताना पुन्हा एकदा चौकशीचे कारण पुढे करून अडवणूक केली जात आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एका दिवसात जात प्रमाणपत्र दिले जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कित्येक कार्यालयात एका दिवसात साधा अर्जही स्वीकारला जात नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे दूरच राहिले. त्यामुळे शासनाच्या या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाकरिता तसेच नोकरीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक असते. त्याकरिता कार्यालयात मोठी गर्दी झालेली असते. परंतु काहीतरी कारण दाखवून प्रकरणे नाकारण्याचा सपाटा सुरू असतो. समाधान झाल्याशिवाय जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. शैक्षणिक प्रवेशाकरिता वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्रे देणे आवश्यक असते. वेळेत प्रमाणपत्र सादर केली नाही तर विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाण्याची भीती असते. जात पडताळणी प्रमाणपत्र देताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील सर्व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा तिन्ही अधिकारी एका वेळेस उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे सुद्धा नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र शिक्षण घेत असताना शाळेतच देण्यात यावे. जात प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व सामाजिक संघटना व पालकांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करेल याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे .या निवेदनाची प्रत बार्टीचे महासंचालक किशोर गजभिये यांनाही देण्यात आली आहे.यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण हे पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: