अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास मालगाडीचा एका डबा रेल्वे रुळावरून घसरला. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कार्यवाही सुरू केली.जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मालगाडीचा डबा पुन्हा रुळावर आणण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आले.
या दरम्यान या अप लाइन मुंबई पुण्याकडे या मार्गावरून जाणाऱ्या इतर रेल्वे गाड्यांना विविध ठिकाणी थांबविण्यात आले आहे,मालगाडी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी रुळावर आली आहे, त्या रेल्वे रुळांची तपासणी टेक्निशियन टीम कडून झाली असून टीम चे कार्य पूर्ण झाले आहे वाहतूक पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
यावेळी मनमाड तसेच चाळीसगाव चे आर पी एफ पोलिस निरिक्षक,कर्मचारी,एस आय बी भुसावळ,डी आय ओ,चाळीसगाव ए डी एन,पी डब्ल्यू आय चाळीसगाव,तसेच रेल्वेतील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
