अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग जळगावच्या अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव येथे चालु शैक्षणिक वर्षापासुन सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबविले जात असतात. संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त शाळेत दर शनिवारी “संविधानाची शाळा”हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला जातो.यामध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची निर्मिती,संविधानाची ओळख,हक्क अधिकार,लोकशाही वर लघु फील्म,पोस्टर प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांशी खेळाच्या माध्यमातून संविधानावर माहिती सांगितली जाते. सागर नागणे, पुणे येथील इकोनेट संस्थेच्या अलका पावनकर,गौरी भुपटकर आदि वक्ते दर शनिवारी येत असतात.या कामी शानिशा अधिकारी राजेन्द्र कांबळे सर,मुख्यध्यापक सोनाली महाजन ,तालुका समन्वयक अनिल पगारे,प्रभारी गृहपाल लक्ष्मीकांत कोठावादे,शिक्षक दिलीप परदेशी,वनिता बेरड,रुपाली सोनावणे,दिपाली तडवी,महेन्द्र कुमावत,अनिता तोंडे,ज्ञानेश्वर लिंगायत,संभाजी पाटील यांचे सहकार्य मिळत असते.
