अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- रिक्षा घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या वडिलांची बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील एम.जी.नगर परिसरात दिनांक १४ शनिवारी रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिकन मोरे (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पत्नी व मुलासह एम.जी.नगर येथे वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा काही दिवसांपासून रिक्षा घेण्यासाठी पैशांची मागणी करत होता. शनिवारी सायंकाळी याच कारणावरून घरात वाद झाला. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने लाकडी काठी तसेच कंबरेच्या पट्ट्याने वडिलांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीत भिकन मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी करत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे चाळीसगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून कौटुंबिक वादाने टोक गाठल्याने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
