Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपरखेडे येथे बेकायदा मांस विक्रीविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पोलिस पथकावर अचानक दगडफेक करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत दोन अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी असे एकूण पाच पोलिस कर्मचारी तसेच तीन नागरिक जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होत
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरखेडे येथे एका घरात बेकायदा मांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक कुणाल देशमुख, हवालदार रविंद्र राठोड, संदीप ईश्वर पाटील व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक शुक्रवारी सकाळी कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी जखमी झाले. काही नागरिकांनाही या घटनेत मार लागला आहे. जखमींवर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटनास्थळावरून सुमारे ११ किलो मांस जप्त केले असून मांस विक्री करतांना मिळून आल्या प्रकरणी हवालदार संदीप पोपट पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित ईस्माईल भिकन कुरेशी व शेख भिकन गफूर कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तसेच पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या संशयितांविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे पिंपरखेडे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
