अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिनांक ९ जुलै रोजी शहर पोलिस स्टेशन व शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मोटर वाहन कायद्यानुसार चाळीसगाव शहरात मोठी कारवाई राबविण्यात आली. ही कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप एकशिंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईदरम्यान मा. न्यायालयासमोर तसेच पोलीस स्टेशनसमोर अशा दोन ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण १३७ प्रकरणांमध्ये एकूण ₹९९,२०० दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाईत दंडित झालेल्या वाहनांची संख्या दंड आकारणारे पोलिस कर्मचारी
आबा वाघ – १६ प्रकरणे, ₹७,७०० दंड
बापूराव मोरे – ८ प्रकरणे, ₹४,२०० दंड
भूषण पाटील – १६ प्रकरणे, ₹७,९०० दंड
ज्ञानेश्वर गीते – ११ प्रकरणे, ₹९,००० दंड
मच्छिंद्र तारडे – १८ प्रकरणे, ₹८,६०० दंड
महेंद्र जाणे – १३ प्रकरणे, ₹९,५०० दंड
प्रताप पाटील – १२ प्रकरणे, ₹१७,५०० दंड
रमेश चौधरी – ३८ प्रकरणे, ₹३२,१०० दंड
रणजीत सोनवणे – ५ प्रकरणे, ₹२,७०० दंड
ही माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप एकशिंगे यांनी दिली असून, पुढील काळातही असे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
