अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी): गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी मुराद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चाळीसगाव तालुका अध्यक्षपदी विजय गायकवाड, तालुका उपाध्यक्षपदी शरीफ मिर्झा, तर तालुका सचिवपदी नासिर शेख यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
याचबरोबर चाळीसगाव शहर अध्यक्षपदी अफरोज खान, शहर उपाध्यक्षपदी भूषण शेटे, तर शहर सचिवपदी अलीम सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व नियुक्त्या संघाचे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, भगवान सोनार तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण व शहरातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.ग्रामीण पत्रकारांचे हक्क, संरक्षण आणि सशक्तीकरणासाठी संघटनेच्या माध्यमातून भरीव कार्य अपेक्षित असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
