अधिकार आमचा न्युज नेटवर्क
एसटी सेवा लॉकडाऊन च्या काळात पुर्णतः बंद होती या मूळे एसटी ला मोठे नुकसान सहन करावे लागले आणि आता काही प्रमाणात जिल्ह्याअंतर्गत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 1 सीट वर फक्त एक व्यक्ती या प्रकारे सोशल डिस्टनसिंग चे पालन करत एसटी सेवा सुरू आहे यामुळे एसटीत फक्त 22 प्रवासी एकवेळस प्रवास करू शकता यामुळे एसटी चे आर्थिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने भाडे दीड पटीने वाढविण्यासाठी मागणी केली आहे मागणी आजून मंजूर झालेली नाही पण जर मागणी मंजूर झाली तर 10 रुपयाचे तिकीट 15 रुपयांना मिळणार.
