अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- फियांदी नामे सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय २६, रा. दत्त मंदिर जवळ शनिपेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ०९ सप्टेंबर २०२५ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या फिर्यादीत, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचा ७ हजार रुपयांचा बोकड तसेच आवेश शेख यांची ६ हजार रुपयांची बकरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी सीसीटीएनएस गु.र.नं. २१६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर, दि. १० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिघा आरोपींना निष्पन्न केले. अटक केलेले आरोपी गणेश वासुदेव जाधव (वय २०), गणेश अशोक पाटील (वय २१),अक्षय विजय वंजारो (वय २३), सर्व रा. चिंचोली, जि. जळगांव
सखोल चौकशीत आरोपींनी केवळ शनिपेठ येथील बकरी व बोकड चोरीची कबुली दिली नसून, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून ३ बकऱ्या चोरल्याचेही उघड केले. चोरी केलेला बोकड खाटीक राहुल राऊळकर यांना विकल्याची माहिती आरोपींनी दिली. याप्रकरणी चोरी गेलेली बकरी खाटीककडून जप्त करण्यात आली असून, बोकडाच्या बदल्यात मिळालेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि. शरद बागल,सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, पोना किशोर पाटील, पोकों रतनहरी गिते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे, रविंद्र कापडणे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव) यांनी सहभाग घेतला.
