अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
शासन परिपत्रक : कार्यालयीन ओळखपत्र लावणे बंधनकारक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे दोन मोठे सण यंदा एकाच काळात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असतानाही जळगाव पोलीस प्रशासनाच्या अचूक नियोजनामुळे हे दोन्ही सण सौहार्दपूर्ण वातावरणात, शांततेत आणि उत्साहात पार पडले. या उत्कृष्ट कार्याबद्दल सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करून त्यांचा गौरव करण्यात आला.
फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही समाजांच्या मिरवणुका शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.

या प्रसंगी फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, सय्यद उमर, शेख जमील, सय्यद जावेद, कामिल खान, इमाम भाया, शफी ठेकेदार, शेख शब्बीर, असलम खान, शाहिद खान यांच्यासह अनेक मान्यवर व सदस्य उपस्थित होते.
