अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील जहागिरदार वाडी, वॉर्ड क्रमांक १७ येथील रहिवाशांचे जीव मुठीत घेऊन राहत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेले पंधरा ते वीस दिवस एक झाड थेट वीज वितरण पोलवर पडले आहे. परिणामी तारे ताणले गेले असून आता त्यातून चिंगार्या देखील निघू लागल्या आहेत.
नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) ला तीन ते चार वेळा तक्रार दिली असून,7588408219 या क्रमांकावर देखील वारंवार संपर्क साधण्यात आला मात्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी फोनच उचलत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आजच्या घडीला विजेच्या तारे एकमेकांना स्पर्श करून ठिणग्या उडत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांचा प्रश्न आहे की, उद्या काही अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
स्थानिक प्रशासन आणि MSEB यांनी याची तातडीने दखल घ्यावी आणि दुर्घटना घडण्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
